“आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही, तसेच कट कारस्थान देखील रचलं नाही”

मुंबई | राज्यासह देशातील सिनेसृष्टीला हादरवून टाकणारं प्रकरण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये घडलं होतं. अर्यन खान (aryan khan drugs case) प्रकरणानं सर्वत्र बाॅलिवूडची नाचक्की झाली होती.

एनसीबीच्या कारवाईत एका क्रुझवर ड्रग्ज पार्टीचा (drugs) मोठा खुलासा एनसीबीनं (NCB) केला होता. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी या कारवाईचं नेतृत्व केलं होतं.

एनसीबीनं क्रुझवर छापा टाकत प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. तेव्हापासून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात हे प्रकरण गेलं होतं.

आर्यन खानच्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानं या प्रकरणाची चर्चा अवघ्या देशात झाली. तपास अधिकारी समीर वानखेेडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगला होता.

अशातच आता मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खान प्रकरणात महत्त्वपूर्ण सुनावणी केली आहे. आर्यन खानकडं क्रुझ पार्टीमध्ये कसलही ड्रग्ज आढळलं नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

आर्यन खानच्या व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये कसल्याही प्रकारची ड्रग्जबद्दलची माहिती समोर आली नसल्याची महत्त्वपूर्ण सुनावणी न्यायालयानं केल्यानं आर्यन खान प्रकरणाला नवीन वळण भेटणार आहे.

आर्यन खानकडं कसल्याही प्रकारचं ड्रग्ज आढळलं नाही. आर्यन खान प्रकरणात चॅटमध्ये कसलंही कटकारस्थान आढळलं नसल्याचं न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये नमुद करण्यात आलं आहे.

आर्यन खान आणि अरबाज मर्चंट हे दोघेहे स्वतंत्रपणे प्रवास करत होते. त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांकडं ड्रग्ज सापडलं आहे मात्र त्यांची मात्रा अगदी कमी आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

आर्यन खानवर या प्रकरणात कटकारस्थान रचल्याचं कलम लावण्यात आलं होतं. आम्हाला हे अजून विस्तृतपणे तपासावं लागणार आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, एनसीबीच्या आर्यन खानवरील कारवाईवर महाविकास आघाडीकडून आधिच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. आता तर थेट न्यायालयानं आर्यन खानला थोड्याप्रमाणात दिलासा दिल्यानं महाविकास आघाडीच्या समीर वानखेडे विरोधातील कारवाईला बळ मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

 होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा आहे का?, कोर्टाचा मोठा निर्णय

घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा 

समीर वानखेडेंची बाजू भक्कम, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा दाखला 

‘…आता हे सहन होत नाही’; अमृता फडणवीसांचं नवं गाणं सोशल मीडियावर ट्रोल 

“कृषी कायदे मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ”