मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

बंगळुरु | कर्नाटकमधील एका महाविद्यालयानं मुस्लीम मुलींनी हिजाब घातल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश नाकारला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात वादंग निर्माण झाला.

संपूर्ण देशभरात हिजाब वाद पेटलेला पहायला मिळाला होता. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेले पहायला मिळाले होते.

आज हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी होती. सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे .

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच, असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शाळेतील विद्यार्थी शाळेचा गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत, असंही उच्च न्यायालयानं निर्णय देताना म्हटलं आहे.

हिजाब हा मुस्लीम धर्माचा अनिवार्य भाग नाही, असंही निकला देताना उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सध्या हा निकाल देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

  ‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

  ‘काॅंग्रेस मूर्खांच्या नंदनवनात रमलीय’; ‘या’ काॅंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  मोठी बातमी! ….म्हणून मुंबईत ‘इतक्या’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार