मुंबई | गेल्या तीन वर्षापासून कोरोना (Corona) महामारीनं हाहाकार माजवला आहे. या महासाथीच्या रोगामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं.
कोरोनानं सगळंच ऑनलाईन (Online) झालं. यातच शिक्षणंही ऑनलाईन झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे संपूर्ण शाळा काॅलेज बंदच होती.
कोरोना आता आटोक्यात येत आहे. त्यामुळे सगळं पुन्हा पूर्वपदावर येतंय. जनजीनवही सुरळीत होतंय. त्यामुळे कुलूप लागलेल्या शाळाही (School) उघडायला सुरुवात झाली आहे.
कोरोना काळात मागील दोन वर्षात अधिकाधिक काळ शाळा बंदच होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं.
कोरोना काळात झालेलं शैक्षणिक नुकसान भरण्यासाठी शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा थोडा हिरमूस होऊ शकतो.
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या (Summer vaccations) रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे.
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नाही.
दरम्यान, विद्यार्था्यांच नुकसान होऊ नये म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुलींचे ‘हे’ सिक्रेटस् प्रत्येक मुलाला माहिती असायला हवेत, जाणून घ्या नेमकं काय आहे
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”
डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव