मोठी बातमी ! केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणेंविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हृदयाचा त्रास उद्भवू लागल्यामुळे नारायण राणेंना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयात गेले असता डाॅक्टरांनी त्यांची अॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला.

नारायण राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिये दरम्यान काही ब्लॉकेजेस होते ते काढण्यात आले आहेत.

नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

आज आणि उद्या नारायण राणे यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल आणि त्यानंतर प्रकृती पाहून त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Gold Rate | सोने-चांदीच्या दरात वाढ, वाचा ताजे दर

  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट आली समोर!

  “स्वाभिनाने जगणारा संभाजी छत्रपती आहे, कोणासमोर झुकून मी खासदारकी घेणार नाही”

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरेंनी सांगावं की मी…” 

सेक्स वर्क हा एक व्यवसाय, त्यांनाही सन्मानाची वागणूक द्या- सर्वोच्च न्यायालय