Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी! उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करत दुसरी इनिंग खेळणार?

मुंबई | राजकारणात केव्हा काय घडेल याविषयी काहीही सांगता येत नाही. महाराष्ट्रातील राजकारणाने देखील आत्तापर्यंत अनेक मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसमध्ये असणाऱ्या उर्मिला मातोंडकर लवकरंच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे.

नुकतंच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या जागेसाठी राज्यपालांकडे यादी सोपविण्यात आली आहे. या यादीत शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या देखील नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकर आता लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. या लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला होता. यानंतर कॉंग्रेस मधील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी कॉंग्रेसला राजीनामा दिला होता.

उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उर्मिला मातोंडकर यांचं आमदारकीसाठी मन वळवलं होतं. यामुळे आता शिवसेनेकडून आमदारकीसाठी मातोंडकरांचं नाव देण्यात आलं आहे.

दरम्यान, अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत.

भाजप नेते चंद्रकांत पाटील सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी सरकारवर कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून निशाणा साधत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीसह शरद पवारांवर घणाघात केला होता.

जर राज्यात केव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर शरद पवार अजित दादांना नाही तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांची राजकीय उंची नेमकी काय आहे? काहीही कर्तुत्व नसताना उंची नसताना ते बोलत असतात. त्यांनी आधी आपली उंची काय आहे ते पाहावं. ते मोठ मोठ्या नेत्यांबाबत असंच काहीसं बोलून आपली उंची वाढवत असतात, असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धर्म परिवर्तनासाठी माझ्यावर दबाव टाकला; ‘या’ प्रसिद्ध सेलेब्रिटीच्या पत्नीचे धक्कादायक आरोप!

‘कॉंग्रेस नेत्यासोबत वाद झाल्यानं पवार संतापून बैठकीतून निघून गेले अन्…’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

‘निक रात्री मला झोपू देत नाही अन् रात्री उठून माझ्यासोबत…’; प्रियांका चोप्राचा पतीविषयी मोठा खुलासा!

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पुनावाला यांची कोरोना लसीसंदर्भात मोठी घोषणा!

प्रेग्नन्सीनंतर अनुष्का चित्रपट सृष्टीला अलविदा करणार? अनुष्का शर्माचा मोठा खुलासा!