नवी दिल्ली | जवळ जवळ दोन महिने होत आले मात्र तरीही रशिया आणि युक्रेनमधील (Russia-Ukrain) संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांपैकी एकही देश माघार घेण्यास तयार नाही.
रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. अशात युद्धाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर एका रशियन जनरलने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा युक्रेनमधील नवीन हेतू स्पष्ट केला आहे.
रशियाच्या लष्कराचं पूर्व युक्रेन तसेच दक्षिण युक्रेनवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचं उद्दिष्ट आहे आणि असं केल्याने मोल्दोव्हा देशाचा मार्ग मोकळा होईल जिथे रशिया ट्रान्सनिस्ट्रियाच्या प्रदेशाला पाठिंबा देतो. म्हणूनच रशिया डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशांवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी लढा देत आहे, जे एकत्रितपणे डॉनबास प्रदेश बनवतात, असं रशियाच्या जनरलने सांगितलं आहे.
मिन्केएव्हचं वक्तव्य हे युक्रेनमधील मॉस्कोच्या नवीनतम महत्त्वाकांक्षेचे सर्वात तपशीलवार वर्णन आहे, जे असं सांगतंय की रशिया तिथे लवकरच आपलं आक्रमण समाप्त करण्याची योजना आखत नाही, असं रशियाच्या सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्टचे डेप्युटी कमांडर, रुस्तम मिनेकायेव म्हणालेत.
डॉनबासमधील लढाई सुरू झाली आहे. जर रशियाने प्रदेश काबीज करण्याच्या प्रयत्नात यश मिळवलं, तर युक्रेनची राजधानी कीव काबीज करण्याचा अयशस्वी प्रयत्न करूनही ते राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा विजय मिळवून देईल असं बोललं जातंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“देवेंद्र फडणवीसांची सध्याची अवस्था उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशीये”
Sharad Pawar: शरद पवार यांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले…
KGF-2 आणि RRR सिनेमावर नवाजुद्दीन सिद्दीकी चांगलाच भडकला, म्हणाला ‘अभिनय गेला तेल लावत…’
“राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष होणार, आपला मुख्यमंत्री झालाच पाहिजे”
‘लग्न झालेल्या पुरुषांमध्ये…’; आझमा फलाहच्या वक्तव्याची एकच चर्चा