दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

मुंबई | सोन्याचे दागिने हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिणे घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून देखील भारतातील लोक सोन्याला प्राधान्य देताना दिसतात. भारतात सोन्याच्या असणाऱ्या वाढत्या मागणीमुळे सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेले काही दिवस सोन्याच्या दरात सातत्याने घट अनुभवायला मिळत होती. मात्र, आज सोन्याच्या दरात मोठी वाढ अनुभवायला मिळाली आहे. सध्या सोन्याच्या दरात असाच चढउतार राहिल, असं अभ्यासक बोलत आहेत.

काल एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचा बाजार 47 हजार रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला होता. आज हाच दर 47 हजार 330 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे. अशाप्रकारे आज सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली आहे.

आज चांदीच्या दरातही वाढ अनुभवायला मिळाली आहे. काल एमसीएक्सवर प्रती किलो चांदीचा दर 63 हजार 200 रुपये प्रती किलो होता. आज हाच दर 63 हजार 400 रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे. अशाप्रकारे आज चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये सोने-चांदीचे दर खूप खाली उतरले होते. मात्र, येत्या काही दिवसांत सोने-चांदीचे दर वाढतील असे अनेक अभ्यासक बोलत आहेत. यामुळे साने-चांदी खरेदी करण्याची हीच संधी मानली जात आहे.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो.

या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

महत्वाच्या बातम्या-

अंकिता लोखंडे बनली देवदासची पारो, डान्स पाहून चाहते घायाळ

कौतुकास्पद! ढोलकवर थाप मारत चिमुकल्यानं गायलं सुंदर रॅप, पाहा व्हिडीओ

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजच्या वडिलांनी मुलीसाठी उचललं मोठं पाऊल!

“मामा-मामी माझ्या आईवडिलांसारखे आहेत, मी त्यांची माफी मागतो”

नवरदेवानं असं काही केलं ते पाहून नवरीला बसला धक्का, पाहा व्हिडीओ