मुंबई | अगदी कमी काळात जास्त पैसा मिळवणं हे एकच ध्येय ठेवून अनेकजण काम करत असतात. मार्ग हा कोणता आहे याचा विचार कधी केला जात नाही पण त्यांनतर होत असं की, सर्वत्र गोंधळ निर्माण होतो.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा फायदा आणि नफा हा होत असतो पण त्या माध्यमातून अनेकांना गंडवण्याचा धंदा सध्या सुरू झाला आहे. सध्या एक प्रकरण प्रचंड गाजत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील विशाल फटे या युवकानं मोठा घोटाळा केला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो, असं सांगून अनेकांना तब्बल 15 कोटींहून अधिक रक्कमेचा गंडा घातला आहे.
अनेकांना कमी कालावधीत मोठं होण्याचं स्वप्न दाखवून फटेनं आता फाटा मारला आहे. इतका मोठा घोटाळा करून विशाल फटे हा फरार झाला आहे. परिणामी सध्या सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा आहे.
विशाल फटे हा फक्त बीए पास आहे पण त्याच्या चालाख बोलण्यावर अनेकांनी विश्वास टाकल्यानं सध्या मोठी तारांबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
मुळचा मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी असणारा विशाल हा वास्तव्यास बार्शीमध्ये होता. शिवाजी महाविद्यालयासमोर विशाल एक नेट कॅफे चालवायचा. परिणामी अनकांशी संबंध आल्यानं त्यानं या ओळखीचा असा गैरफायदा घेतला आहे.
विशालनं एक शेअर कंपनी देखील काढली होती. फोग्स ट्रेडिंग कंपनीचा तो सह व्यवस्थापक होता. एकदा त्यानं अनेकांना तब्बल 28 टक्के परतावा मिळवून दिला होता.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते विशालला एका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. परिणामी अनेकजण विशालच्या जाळ्यात सहज अडकत गेले.
1 जानेवारी रोजी त्यानं एक स्किम आली आहे असं सांगत अनेकांकडून पैसे घेतले. 10 लाख रूपये जमा करायचे आणि एका वर्षात तब्बल 6 कोटी मिळणार, अशी स्किम असल्याचं विशालनं अनेकांना सांगितलं होतं.
दरम्यान, सध्या विशाल सर्व रक्कम घेऊन फरार झाला आहे. परिणामी पोलिसांकडं तक्रार करणाऱ्यांचा ओघ आता वाढायला लागला आहे. विशालनं जसं अनेकांना गंडवलं तसं कोणीही गंडवू शकत परिणामी शेअर बाजाराबद्दल माहिती असेल तरच गुंतवणुक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“कंडोमपेक्षा कोरोना टेस्ट महत्त्वाची, सेक्सपूर्वी हे नक्की करा”
किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ
विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव
अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद
शाळा सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…