हिन्दुस्थानी भाऊला मोठा झटका, कोर्टानं दिलेला निर्णय ऐकून रडू कोसळेल!

मुंबई | राज्यातील अनेक भागात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं केली होती. मुंबईतील धारावी, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनं केल्याचं पहायला मिळालं होतं.

इन्टाग्रामचा कथित इन्फ्यूएन्सर हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याच्यावर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला अटक देखील करण्यात आली होती.

अटक केल्यानंतर हिंदुस्थानी भाऊला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं.

त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी झालेल्या नुकसानाबाबत विकास पाठकने न्यायालयात बेशर्त माफी असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता जामीन मिळेल, अशी शक्यता होती.

धारावीत घडलेल्या घटनेमागे कोणत्या राजकीय संस्थेचा हात आहे का?, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी हवी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती.

त्यातच आता विकास पाठकच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विकास पाठकला अटक केल्यानंतर सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लीप व्हायरल होत होत्या. त्यावर देखील आता पोलीस अॅक्शन घेताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

जेनेलियाने दिली गुड न्यूज! आता रितेश होणार ‘मिस्टर मम्मी’

धक्कादायक! केस वाढवल्यानं शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

पिझ्झा कमी खाल्ल्यानं वजन कमी होतंय का?, साराने दिलं भन्नाट उत्तर

“स्त्रीयांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं, ही मानसिकता बदलावी लागेल”

  Gold Rate: आजचे सोन्याचे दर काय? जाणून घ्या एका क्लिकवर