Top news देश राजकारण

ममता बनर्जींला मोठा धक्का! पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसची मोठी राजकीय खेळी

कोलकत्ता | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं आहे. पश्चिम बंगाल मधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेससहित इतर सर्वच पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. अशातच आता कॉंग्रेसने पश्चिम बंगालमध्ये मोठी खेळी खेळली आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला पश्चिम बंगालमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसने डाव्या पक्षांशी हातमिळवणी केली आहे. गुरुवारी या प्रस्तावावर कॉंग्रेसने शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची डाव्या पक्षांबरोबरची आघाडी निश्चित झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा खूप काही दिवसांपासून चालू होत्या. यासाठी डाव्या पक्षांनी कॉंग्रेसकडे प्रस्ताव सोपविल्यानंतर कॉंग्रेसच्या पक्षाश्रेष्ठींनी यावर विचार करत अखेर गुरुवारी या प्रस्तावाला संमती दर्शवली आहे.

कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकत्र आल्यानं ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण अगोदरंच भारतीय जनता पार्टी देखील पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकीची जोरदार तयारी करत आहे. अशातच आता कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकत्र आल्याने त्यांची आघाडीही मोठी राजकीय शक्ती ठरणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल मधील भाजपच्या एका खासदाराच्याच पत्नीने तृणमूल कॉंगेसचा झेंडा हाती घेतला आहे. भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सुजाता मोंडल यांच्या तृणमूल कॉंग्रेस मधील प्रवेशामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीने विरोधी पक्षाचा झेंडा हाती घेताच खासदार सौमित्र खान यांनी पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.

तृणमूल कॉंग्रेसने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोलकत्त्यात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी सुजाता मोंडल यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सुजाता मोंडल यावेळी म्हणाल्या की, कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता पुढे काय करायचं आहे याचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते अमित शहा पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. अमित शहा यांचा पश्चिम बंगालचा दौरा पूर्ण होताच सुजाता मोंडल यांनी तृणमूल कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रियांका गांधींसह अनेक कॉंग्रेस नेत्यांना अटक आणि सुटका

राजधानीत राडा! शेतकऱ्यांना पाठींबा दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी फोडलं आपच्या आमदाराचं ऑफिस; पाहा व्हिडिओ

‘KBC’तील एक कोटी फक्त नावालाच, वाचा करोडपती होणाऱ्या स्पर्धकाला किती रुपये मिळतात?

सोन्याची झळाळी पुन्हा उतरली, वाचा आजचा सोन्याचा भाव

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या पतीवरंच कारखान्यातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल