मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थावर हिंदूूत्वाची प्रखर भूमिका मांडत राज्याच्या राजकारणाला नवं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मनसे आणि भाजप युतीची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीमधील भोंग्यांचा तीव्र विरोध केला. मशिदीवरील भोंगे काढून टाकावेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. त्यावर आता मनसेमध्येच नाराजीचं वातावरण आहे.
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसेच्या शाखा अध्यक्षांसह इतर मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
मशिदीवरील भोंगे लावावेत, असा कोणता धर्म सांगतो?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यावेळी भोंगे उतरवले नाही तर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
त्यावरून आता चांगलंच वातावरण तापलं आहे. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मनसेला मोठी खिंडार पडणार असल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजपमध्ये युतीची शक्यता आहे. आज राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची भेट देखील झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“गद्दारी ती गद्दारीच, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी…”, नारायण राणे कडाडले
पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
…तर चंद्रकांतदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करू – संजय राऊत
सिगारेट पिणाऱ्यांनो… वेळीच व्हा सावध, नाहीतर डोळेही गमावून बसाल
“मनसे बिनबुडाची, त्यांना बुड नाही अन् शेंडाही नाही”