राकेश झुनझुनवालांना मोठा धक्का; एका आठवड्यात झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

मुंबई | शेअर मार्केटमधील बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवालांना मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारात झुनझुनवालाचं अवघ्या एका आठवड्यात तब्बल 753 कोटींचं नुकसान झालंय. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार टेंशनमध्ये आहेत.

टायटन कंपनीचा शेअर घसरल्यानं राकेश झुनझुनवाला यांच्या संपतीतही मोठी घट झाली आहे. प्रतिशेअर 174 रुपये म्हणजेच जवळपास 7 टक्क्यांनी आठवडाभरात घसरण झाली आहे.

टाटा समूहाच्या या कंपनीत राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची भागिदारी आहे. राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे साधारणपणे साडेचार टक्के शेअर आहेत.

प्रतिशेअर 174 रुपयांचं नुकसान झाल्यानं झुनझुनवालांना एकूण 153 कोटींचा फटका बसला आहे. शेअर बाजारातील घसरणीचा फटको सर्वात जास्त झुनझुनवालांना बसला आहे.

अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सर्व गुंतवणूकदारांचे मिळून जवळपास 16 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टपेक्षाही अधिक धोकादायक असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर जगभरात पुन्हा भितीच वातावरण पसरलं आले. अशात अनेक देशांतील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे.

शेअरबाजारात गुंतवणूकदांना मोठा फटका बसलाय. काही काळातच गुंतवणूकदारांचं लाखो कोटींचं नुकसान झालं आहे. काही देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. आणि त्याचाच फटका अनेक शेअर बाजाराला बसलाय.

दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या नवा व्हेरिएंट डब्ल्यूएचओनेही मान्य केल्यानं चिंतेचं वातावरण आहे. या नव्या व्हेरिएंटला ओमीक्रोन नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटचा शेर बाजाराला मोठा फटका बसला आहे.

मुंबई शअर बाजारात मोठी घसरण होऊन काही तासातच गुंतवणूकरांचे लोखो कोटींचं नुकसान झालं आहे. गेल्या 7 महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अजूनही भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होऊ शकतं” 

भाजपला मोठं खिंडार पडणार?; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य 

अमित शहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

मॉर्निंग वॉकसाठी टेरेसवर गेला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; कोल्हापूरमधील घटनेनं खळबळ 

अण्णा हजारेंची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल