जिओ आणि आयडियामध्ये मोठा राडा, जिओनं केली ही धक्कादायक तक्रार

मुंबई | रिलायन्स जिओने व्होडाफोन आयडिया (VIL) च्या नवीन दर संरचनेबद्दल भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडे तक्रार केली आहे. जिओने (JIO) या संदर्भात ट्रायला एक पत्र लिहिलं आहे.

रिलायन्स जिओने ट्रायकडे तक्रार (Complaint) केली आहे की व्होडाफोन आयडियाने वापरकर्त्यांसाठी असे काही टॅरिफ प्लॅन देखील सादर केले आहेत, जे महाग आहेत परंतु त्याच वेळी नंबर पोर्टेबिलिटीच्या सुविधेत समस्या निर्माण करतात.

ET ने सूत्रांचा हवाला देऊन अहवाल दिला की गेल्या आठवड्यात दूरसंचार नियामकाला पाठवलेल्या पत्रात जिओने सांगितले की व्होडाफोन आयडियाने 28 दिवसांच्या वैधतेसह एंट्री-लेव्हल प्लॅन 75 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढवला आहे. परंतु त्यासोबत एसएमएस सेवा दिली जात नाही, त्यामुळे ग्राहक पोर्टसाठी संदेश पाठवू शकत नाही.

Vodafone Idea बद्दल बोलायचे तर, ग्राहकांना कंपनीच्या 179 रुपयांच्या प्लॅनमधून एसएमएस सुविधा मिळत आहे. जर ग्राहकाला नंबर पोर्ट करून घ्यायचा असेल, तर त्याला किमान 179 रुपयांचा प्लॅन रिचार्ज करावा लागेल.

जिओने ट्रायला ही परिस्थिती सोडवण्यास सांगितलं आहे. ईटीच्या सूत्रानुसार, कंपनी एकतर एसएमएस मोफत बनवण्याचा विचार करू शकते किंवा पोर्टिंग प्रक्रियेसाठी एसएमएस पाठवण्याची गरज दूर करू शकते.

दरम्यान,  सध्या भारतात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांचे सिमकार्डधारक सर्वाधिक आहेत. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळते. कंपन्यांचा आकर्षक आणि स्वस्त प्लान देत ग्राहकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न असतो.

गेल्या आठवड्यात तिन्ही कंपन्यांनी आपल्या प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहक चांगली सुविधा देणाऱ्या नेटवर्ककडे धाव घेताना पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 मोदींची स्तुती करणं विद्यार्थ्यांला पडलं महागात; विद्यापीठाने केलं असं काही की…

पोस्टाची बंपर योजना; लेकीच्या 18 व्या वर्षी मिळतील ‘इतके’ लाख 

झेब्र्याला राग आला अन् थेट जंगलाच्या राज्यासोबतच भिडला, घडवली चांगली अद्दल, पाहा व्हिडीओ 

“काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे” 

पुढचे दोन दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी