“आमदारांना घरं मोफत देणार नाही तर…”; जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत 300 घरे देणार असल्याचं जाहीर केलं.

आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत याबाबत स्पष्ट केलं आहे.

आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत दिली आहे.

आमदारांची कोट्यावधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7-8 घरं आहेत. अशातच त्यांना घरं का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सध्या बेघर किंवा मुंबईत घर बांधण्याची ऐपत नसलेले किती आमदार, खासदार असतील राज्यात?

गावाकडे बंगले, आमदार-खासदारांच्या हौसिंग सोसायट्या, आमदार निवास एवढंच नाही तर म्हाडा लॅाटरीत आरक्षण असतानाही वेगळ्या 300 घरांची तरतूद कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, आमदारांच्या या घरावरून चर्चा सुरू असतानाच आपच्या आमदारांच्या निर्णयाची महाराष्ट्रातील आमदारांशीही तुलना होऊ लागली आहे. पंजाबचे आम आदमी पार्टीचे आमदार जसवंत सिंग यांनी केवळ एक रुपया मानधन घेणार असल्याचं आणि आमदारांना मिळणारी पेन्शन सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर आणखी एक गंभीर आरोप 

…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं! 

सावधान! Omicron BA.2 व्हेरिअंटची दोन लक्षणं आली समोर, दिसताच डॉक्टरांकडे जा 

‘बायकोने ऑफिसमध्ये फोन करून चौकशी केली तर….’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय 

“देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात, अन् बेडवरून खाली पडतात”