मुंबई | एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपत्रातेबाबतचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी ठेवली आहे. यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाला सामोरं जायला पाहिजे होतं, विधिमंडळात आपलं म्हणणं मांडायला पाहिजे होतं, चर्चा झाली असती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचं तीन पक्षाचं सरकार का स्थापन केलं, हे महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा सांगता आलं असतं, भाजपची काय भूमिका आहे, हेही स्पष्ट झालं असतं, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
पक्षांतरबंदी कायद्यानुसार आणखी घट्ट कारवाईची संधी उद्धव ठाकरेंकडे होती, मात्र त्यांनी ज्या घाई गडबडीने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, ती माझ्या मते फार मोठी चूक झाली, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
वाजपेयींसारखं नुसतं भाषण करुन निघून जाण्याचा पर्याय होता, मात्र तेही न करता, त्यांनी मतदान करुन घ्यायला पाहिजे होतं, कमी मतं पडून त्यांचा पराभव जरी झाला असता, तरी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन जनतेच्या समोर झालं असतं, असंही ते म्हणालेत.
दरम्यान, घटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार पाहिलं, तर बेकायदेशीर पक्षांतर घडून कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. फुटीर गटाचं कुठल्याही राजकीय पक्षात विलिनीकरण न झाल्यामुळे त्यांना डिसकॉलिफाय करणं अनिवार्य आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“ठाकरे सरकारने 15 महिने टाईमपास केला, आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून दिलं”
नाना पटोलेंचा हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ चित्रा वाघ यांनी केला शेअर!
खासदार नवनीत राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
करिना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार?, स्वत:च केला खुलासा