मुंबई | शिंदे गटाने पाठवलेल्या पत्रात काही अपक्ष आमदारांची नावंही आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांना तो अधिकार आहे की नाही हे तपासलं जाईल. तसेच अपक्ष आमदारांची मतं गृहीत धरली जाणार नाही, असं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी यांचं पत्र दिलं. ते मी स्विकारलं आहे. माझ्याकडे सुनिल प्रभु प्रतोद आहे हेच पत्र आलंय. त्या दिवशी देण्यात आलेल्या पत्रावर सुनिल प्रभु यांनी प्रतोद म्हणून सही केली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
माझ्याकडे एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्याकडे 2/3 बहुमत असल्याचं कोणतंही पत्र आलेलं नाही. दावा करणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी ते सुरतला होते असं सांगितलं, पण आता ते त्यांच्या गावी आहेत. त्यांनी मी इंग्रजी सही करतो मात्र पत्रावरील सही मराठी आहे. त्यामुळे माझी स्वाक्षरी गृहीत धरू नये असं प्रश्नांकीत केलंय. मी ते तपासून घेईल आणि माझी खात्री झाली की विचार करेन, असं झिरवळ म्हणालेत.
दरम्यान, कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो आणि गटनेत्याने प्रतोद निवडायचा असतो. याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी निवडलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्तीचं पत्र दिलं, अशी माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली.
शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी ते सुरतला होते असं सांगितलं, पण आता ते त्यांच्या गावी आहेत. त्यांनी मी इंग्रजी सही करतो मात्र पत्रावरील सही मराठी आहे. त्यामुळे माझी स्वाक्षरी गृहीत धरू नये असं प्रश्नांकीत केलंय. मी ते तपासून घेईल आणि माझी खात्री झाली की विचार करेन, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…तर घर गाठणं कठीण होईल’; नारायण राणेंची शरद पवारांना धमकी
एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांवर पलटवार, म्हणाले…
“एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमागे भाजपच, अजित पवारांना माहिती नाही”
‘का उगाच वणवण भटकताय, चर्चा होऊ शकते’; बंडखोर आमदारांसाठी संजय राऊतांचं ट्विट
‘एकदा तरी चर्चा करायला हवी होती’, राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची नाराजी?