पुणे | लवकरच महाविकास आघाडी सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल. देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील 50 वर्षे भाजपची सत्ता कायम राहील, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. ते देवबाग येथे झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.
शिवसेनेची तेव्हाची भूमिका आणि आताची भूमिका बदलली आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ही बकरी सेना झाली आहे, असं त्यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथाकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्रातील सरकार मात्र राज्य लुटण्याचे काम करत आहे. विकास, प्रगती, दरडोई उत्पन्न यात महाराष्ट्र मागे पडत आहे, असं नारायण राणे म्हणाले.
2024 ला महाराष्ट्रात भाजपच् सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विकासकामं भाजपच्या माध्यमातून झाली आणि यापुढेही होतच राहतील, असा ठाम विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नारायण राणेंनी निधी आणला त्यानंतर आमदारला जाग आली. मात्र कमिशन घेऊन कामे सुरू आहेत. एवढ्या छोट्या मनाचा आमदार महाराष्ट्रात पाहिला नाही, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“पक्षात 12 वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली?, लाथ मारा त्या खासदारकीला”
“वसंत भाऊ तुझी राजसाहेबांना सांगण्याची कधी हिम्मत झाली नाही, आता…”
केंद्र सरकार पाठोपाठ ठाकरे सरकारनेही घेतला मोठा निर्णय!
‘तू कोण आहेस, गांधी की वल्लभभाई?’; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका
राज ठाकरेंच्या सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर