मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2022) लोकसभेत सादर केला आहे. आज सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये अनेक गोष्टींवर भर देण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्र, पायाभूत सुविधा, आरोग्य, तंत्रज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रांसाठी आज अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. त्याचा थेट परिणाम आता शेअर बाजारात पहायला मिळाला.
शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. बजेटमध्ये आयकर किंवा कॉर्पोरेट टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत, त्यामुळे गुंतवणुकदार काही काळ नाराज असल्याचं दिसलं.
आज वाहन आणि तेल आणि वायू क्षेत्रांना मोठा फटका बसला. बँक, भांडवली वस्तू, एफएमसीजी, फार्मा, आयटी, रियल्टी क्षेत्रात समाधानकारक वाढ झाल्याचं पहायला मिळालं.
काही स्टार्टअप्स आणि नवीन उत्पादन कंपन्यांशिवाय कोणालाही दिलासा मिळाल्याचं पहायला मिळालं नाही. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या पदरी निराशा पडल्याचं पहायला मिळालं.
अर्थसंकल्पीय भाषणापूर्वी बाजार 1.50 टक्क्यांहून अधिक वाढीसह उत्साहात होता.मात्र, नंतर मार्केट एका वेळेनंतर 0.50 टक्क्यांनी खाली गेला. बाजार अस्थिर झाल्याचं चित्र पहायला मिळालं होतं.
मात्र, सेन्सेक्स 1000 अंकांपर्यंत वधारला होता. त्यानंतर अर्थमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर काही वेळातच तो पुन्हा 250 अंकांनी घसरल्याचं दिसलं.
त्यानंतर दुपारी दीड वाजता, सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी चढून 58,500 अंकांच्या वर गेल्याचं पहायला मिळालं होतं आणि दिवसअखेर सेन्सेक्स 848 पॉइंट्सने वाढला, निफ्टी 17,500 च्या वर पोहचला आहे.
एकप्रकारे अर्थसंकल्पाला अप थंम्स देत बाजाराने अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. V shape रिकव्हरीमुळे गुंतवणुकरांनी सुटकेचा श्वास देखील घेतला आहे.
दरम्यान, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी 1 टक्क्यांनी वाढले.
महत्वाच्या बातम्या-
Budget 2022 | “देशाला आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प”, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा
Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर
क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा
Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा