मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत सतत चर्चेत आहे. कंगना सोशल मीडियावरून अनेक वा.दग्रस्त विधान करत आहे. कंगना काही बोलली आणि वाद झाला नाही, असं क्वचितच घडलं असेल. कंगनाच्या विधानांमुळे तिला मोठं नुकसान देखील सहन करावं लागलं आहे.
बॉलीवूड मधील नेपो.टीझमचा मुद्दा असो किंवा महाराष्ट्र सरकार, कंगना नेहमीच उघडपणे आ.रोप करत असते. कंगना नेहमी ट्वीटरवरून अनेकांवर निशाणा साधत असते. मात्र, आता एक ट्वीट कंगनाच्या चांगलंच अंगलट आलं आहे.
कंगना राणावतनं काही दिवसांपूर्वी धार्मिक तेढ पसरवनारं वक्तव्य केलं होतं. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मुस्लीम समाजाचं प्राबल्य आहे. मी झाशीची राणी हा चित्रपट बनवून इंडस्ट्रीतील मुस्लीम प्राबल्य मोडून काढलं, असं कंगना काही दिवसांपूर्वी बरळली होती. कंगनाच्या याच वक्तव्याविरोधात वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.
कंगना राणावत हिंदू मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवण्याचं काम करत आहे. कंगना धर्मावरून अनेकवेळा वा.दग्रस्त आणि आक्षेपार्ह्य ट्वीट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला होता. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार कंगनावर गु.न्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, न्यायदं.डाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यासाठी कंगनाने हायकोर्टात धाव घेतली होती. यासाठी कंगनाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.
कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने कंगनाला आणि तिच्या बहिणीला अ,टकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे.
तसेच मुंबई हायकोर्टाने 8 जानेवारी 2021 पर्यंत मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कंगना विरुध्द कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश दिले देखील आहेत. यामुळे तूर्तास तरी कंगना राणावतच्या अ.टकेचा धोका टळला आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान,याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी कंगनाला दोनवेळा समन्स बजावला होता. मात्र, कंगना दोन्हीवेळी चौकशीसाठी हजर झाली नाही. कंगनाला काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी तिसऱ्यावेळी देखील समन्स बजावला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सनी लिओनीने सोशल मीडियावर शेअर केला ‘कलरफुल’ अंदाज
सरनाईकांच्या घरावर छापा पडताच राऊतांचा पारा चढला, भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले…
“…तर शरद पवार अजित पवार यांना नाही तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील”
शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीमुळे अवघ्या 80 तासात सरकार कसं पडलं होतं? वाचा पूर्ण प्रकरण