Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणात मोठी अपडेट; सुशांतबद्दल सोनू सूदनं केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर संपूर्ण देशातील वातावारण ढवळून निघालं आहे. सुशांतच्या मृ.त्यूसंबंधित कित्येक लोक रोज नवनवीन दावे प्रतिदावे करत आहेत. एवढंच नाही तर सुशांत प्रकरणानं राजकीय वळण सुद्धा घेतलं आहे. सुशांत प्रकरणावरून देशात निर्माण झालेली सर्व परिस्थिती पाहता अभिनेता सोनू सूदनं अखेर सुशांत प्रकरणावर मौन सोडत आपलं मत व्यक्त केलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूचा सहारा घेवून राजकारण करणाऱ्या लोकांवर सोनू चिडला आहे. लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुशांत मृ.त्यू प्रकरणाची मदत घेत आहेत, असं म्हणत सोनूनं नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्त माध्यमाशी बोलताना सोनूनं सुशांत प्रकरणावर भाष्य केलं आहे.

सुशांत प्रकरणाच्या सुरुवातीला सुशांतच्या मृ.त्यूचा शोध घेण्यासाठी लोक आवाज उठवत होते. मात्र, आता लोक मुख्य मुद्द्यापासून भटकताना दिसत आहेत. सुशांत आज जर जिवंत असता तर तो ही सर्कस पाहून हसला असता. जे लोक सुशांतला एकदाही भेटले नाहीत ते लोक सुशांत प्रकरणावर आपली मतं देत आहेत. या लोकांना फक्त सुशांत प्रकरणाची मदत घेवून प्रसिद्धी मिळवायची आहे , असं सोनू सूदनं म्हटलं आहे.

मी आणि सुशांत कित्येकवेळा भेटलो आहे. सुशांत आणि मी एकत्र जिममध्ये वर्कआउट करत होतो. सुशांत एक खूप चांगला हिरो होता. एक आउट साईडर असून सुद्धा सुशांतनं खूप काही मिळवलं होतं, असंही सोनू सुदनं यावेळी म्हटलं आहे.

तसेच सुशांत असता तर तो आता त्या लोकांवर हसला असता जे लोक स्वतःच्या मनानेच सुशांतसाठी त्याचा प्रवक्ता बनले आहेत. सुशांतचे कुटुंब घरी शांत बसलेले असताना हे लोक सुशांत संबंधित अनेक गोष्टी वाढवून सांगत आहे, असं मत सोनू सुदनं व्यक्त केलं आहे.

सध्या लोक सुशांतला विसरू लागले आहेत. हे लोक आता प्रसिद्धी मिळवण्यासाठी नवीन मुद्दा शोधून काढतील. या सर्व गोष्टी पाहून खूप दुःख होतं, असंही सोनू सूदनं यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळल्यानं एनसीबीनं रियाला ता.ब्यात घेतलं आहे. 8 ऑक्टोबर रोजी एनसीबीनं रियाच्या घरावर छा.पा टाकत रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना अं.मली पदार्थ प्रकरणी अ.टक केलं होतं.

गेल्या 29 दिवसांपासून तु.रुंगात असणाऱ्या रियाच्या को.ठडीची शिक्षा आज संपत होती. मात्र, सत्र न्यायालयानं आज रियाच्या शिक्षेत वाढ केली असून तिला पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन को.ठडीची शिक्षा सुनावली आहे. तसेच रियाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळल्या नंतर मुंबई उच्च न्यायालयात रियाच्या वकिलांनी रिया आणि शोविकच्या जा.मिनासाठी अर्ज केला होता.

मुंबई उच्च न्यायालयानं रिया आणि आणि शोविकच्या जा.मीन अर्जावरील सुनावणी राखून ठेवली होती. उच्च न्यायालय आज या जा.मीन अर्जावर सुनावणी करू शकतं. मात्र, एनसीबी रिया आणि शोविकला जा.मीन देण्यास को.र्टात विरोध करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणात रियाच्या अडचणीत मोठी वाढ; न्यायायलानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!

सुशांतची ह.त्या की आ.त्मह.त्या; आता सीबीआयनंही केला सर्वात मोठा खुलासा!

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण; आ.त्मह.त्या केली, असा अहवाल देणारा डाॅक्टर आला अडचणीत!

Bigg Boss 14 | लग्न केल्यानंतरही पारस छाबडासोबत रिलेशनमध्ये होती पवित्रा पुनिया?

सर रविंद्र जडेजाचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!