सातारा | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आज ईडीने अटक केली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या 8 तासाच्या चौकशीनंतर अखेर दुपारी तीन वाजता त्यांना अटक करण्यात आली.
अशातच आता राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे नेते आता आक्रमक भूमिका घेत आहेत.
अशातच आता राष्ट्रवादीचे पुर्वाश्रमीचे नेते उदयनराजे भोसले यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आता राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
उदयनराजे यांनी ट्विट करत एक आमंत्रण पत्र शेअर केलं आहे. 24 तारखेला मोठी घोषणा करण्याचं मनात आहे, असं उदयनराजेंनी सांगितलं आहे.
माझ्या वाक्याने तुमच्या मनात ज्या ज्या शक्यता आल्या असतील तसं काहीही होणार नाही, असं सुचक वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं आहे. उद्या अभिनव उपक्रम होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
आपण आजूबाजूच्या घटना पाहत असतो. मात्र, अयोग्य घटना दुरूस्त करत नाही. आम्ही मागे प्रशासकिय घटनांमध्ये बदल केले. आता स्व:ताच एक व्यवस्था उभी करण्याचं ठरवलं आहे, असं उदयनराजे म्हणाले आहेत.
दरम्यान, 24 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावर येण्याचं आवाहन उदयनराजेंनी केलं आहे. त्यामुळे आता उदयनराजे उद्या कोणती घोषणा करणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
पाहा ट्विट-
विशेष निमंत्रण.
पत्रकार व जनतेस आमंत्रण. pic.twitter.com/VUu7TgPni1— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 23, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
“नवाब मलिकांनी आता लवकरात लवकर राजीनामा द्यावा”
“आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील”
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता
मोठी बातमी! अटकेच्या कारवाईनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
BIG BREAKING: 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक