मुंबई | नेहमीच चर्चेत असलेला टीव्हीवरील लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बाॅस’. ‘बिग बाॅस 15’ हा शो सध्या चांगलाच गाजत आहे. त्यामुळे बिग बाॅसचा सीझनही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
यावर्षी बिग बाॅस 15 च्या सीझनच्या पहिले ‘बीग बाॅस ओटीटी’ पहायला मिळाला. बिग बॉस ओटीटीच्या घरात अनेक नवीन घडामोडी पहायला मिळाला. यावर्षीच्या घरात सर्वांचं लक्ष वेधलं आहे ते म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बाबटनं.
या शोमध्ये दिवसेंदिवस शमिता शेट्टी आणि राकेश बापटमधील जवळीक वाढताना पहायला मिळाली. यानंतर ‘बिग बॉस 15’मध्ये राकेशनं वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. मात्र त्याला मधूनच शो सोडावा लागला.
राकेश बापटला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्याला मधूनच शो सोडावा लागला. राकेश बापटला 8 नोव्हेंबरच्या रात्री प्रचंड वेदना झाल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तो सध्या डाॅक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
राकेशची प्रकृती सुधारल्यावर तो शोमध्ये परतण्याची शक्यता आहे. नुकतच राकेश आणि नेहा भसीन या दोघांनी ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री केली आहे. राकेशला पाहताच शमितानं राकेशला मिठी मारली होती. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
बिग बाॅसनं घरामध्ये राकेश-शमितासाठी एक सुंदर डेट आयोजित केली होती. बिग बॉसच्या टीमने एक सुंदर आणि रोमँटिक डेटचा सेटअप करत फुल माहोल बनवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…
‘…ते प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन दाबण्यात आलं’; मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी
आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर