Top news मनोरंजन

Big Boss 15: “सलमानला जर 1000 कोटी मिळत असतील तर त्यातील 950 कोटी मला शिव्या देण्यासाठी मिळतात”

salman khan

मुंबई | छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणजे बिग बाॅस. बिग बाॅस म्हटलं की वादविवाद, मैत्री, रोमान्स, ड्रामा या गोष्टी हमखास पहायला मिळत असतात.

बिग बॉसचा 15चा अंतिम सोहळा जवळ आला असून या वर्षीच्या सीझनचा विजेता कोण ठरणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

30 जानेवारीला बिग बॉसचा 15चा अंतिम सोहळा पार पडणार आहे. अशातच प्रसारित झालेला नवा प्रोमो सोशल मीडियावर चर्चत आहे. ज्यात सलमान खानबद्दल करन कुंद्रानं केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

बिग बॉसचा 15चा नवीन प्रोमो ज्यात घरातील सदस्यांना एक टास्क देण्यात आला असून या टास्क दरम्यान करण कुंद्रा, सलमान खानला जर 1000 कोटी मिळत असतील या शोसाठी तर त्यातील 950 कोटी मला शिव्या देण्याचे असतील, असं करण कुंद्रानं म्हटलं आहे.

सध्या करणचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं असून हा व्हिडीओही जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया द्यायलाही सुरुवात केली आहे.

बिग बॉसचा च्या आगामी एपिसोडमध्ये घरातील सदस्यांचा आतापर्यतचा प्रवास दाखवला जाणार आहे, या प्रोमोमध्ये भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया देखील दिसत आहेत.

बिग बॉसचा 15 चा विजेता कोण हेणार याबाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. विजेतेपदाच्या शर्यतीत आता प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश आणि रश्मि देसाई हे सदस्य उरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  आता ‘या’ ठिकाणीही होणार लशींची विक्री, केंद्र सरकारनं दिली परवानगी

  “…त्यावेळी भारतीय क्रिकेट कणाहीन बनेल”; रवि शास्त्रींचं मोठं वक्तव्य

अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”

महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर

पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!