Bigg Boss 17 Winner l मुन्नवर फारुकी ठरला बिग बॉस 17 चा विजेता! मिळाले तब्बल इतके लाख रुपये

Bigg Boss 17 Winner l बिग बॉस 17 चा धमाकेदार ग्रँड फिनाले आताच संपला आहे. या धमाकेदार शो मध्ये मुन्नवर फारुकी यांनी विजेतेपद पटकावले आहे. अशातच टॉप 5 स्पर्धांमध्ये (Munawar Faruqui) अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण आणि मनारा चोपड़ा यांचा समावेश होता. मन्नारा चोप्रा बिग बॉस 17 च्या तिसऱ्या स्थानावरून बाहेर पडली आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा यांच्यात खूप भांडण पाहायला मिळाले. आता फिनाले एपिसोडमध्ये दोघांमध्ये फेस ऑफही पाहायला मिळाला आहे. (Munawar Faruqui)

तसेच या ग्रँड फिनालेमध्ये सुदेश लाहिरी, कृष्णा अभिषेक, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी बिग बॉसमध्ये त्यांच्या कॉमेडीने भरपूर मनोरंजन केले. याशिवाय सुदेश लाहिरी यांनी गझल संमेलनही आयोजित केले होते. यावेळी त्याने आपल्या कुटुंबीयांची देखील नक्कल केली.

बिग बॉसमध्ये खान बंधूंची मस्ती :

बिग बॉस 17 चा हा शो सलमान खान हा होस्ट करत आहे. त्याचे भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान देखील वीकेंडला शोमध्ये दिसले होते. आता दोघे फिनालेमध्येही दिसत आहेत. तिन्ही भावांनी मिळून खूप मजा केली. यावेळी भारती सिंगही दिसली.(Munawar Faruqui)

विजेत्याला मिळाले एवढे रुपये :

बिग बॉस 17 मध्ये मुनव्वर फारुकीने विजेतेपद पटकावले आहे. मुनव्वरला ट्रॉफीसह 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळले आहे. यासोबतच त्यांना Hyundai ची नवीन Creta कार देखील मिळाली आहे.

मुनव्वर फारुकी यांच्यासाठी हा आनंद खूपचमोठा आहे. कारण 28 जानेवारीला फिनालेच्या दिवशी त्यांचा वाढदिवस देखील होता. मुनव्वर इकबाल फारुकी हा एक भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आहे. 2022 मध्ये त्याने कंगना राणौतचा रिॲलिटी टीव्ही शो, लॉक अप सीझन 1 देखील जिंकला आहे.

News Title : Munawar Faruqui Big Boss17 Winner 

महत्त्वाच्या बातम्या-

Bigg Boss 17 Winner l मुन्नवर फारुकी ठरला बिग बॉस 17 चा विजेता!

Heart Attack Winter l हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका जास्त वाढतोय? हे तीन व्यायाम करा

OBC Reservation l मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज कडाडणार! ओबीसी नेते घेणार मोठा निर्णय

Who is Manoj Jarange l कोण आहेत मनोज जरांगे? प्रत्येक मराठ्याला हे माहित असायलाच हवं

Manoj Jarange Patil l मराठा समाजाला आरक्षण मिळताच मनोज जरांगेंनी केले असे काही की…