मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ पर्व 2 हा छोट्या पडद्द्यावरील शो चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. या शोमधील प्रत्येक स्पर्धक या ना त्या कारणामुळे चर्चेत राहीले आहेत. वाईल्ड कार्ड एंट्रीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेला आरोह वेलणकर या स्पर्धकाने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
आरोहने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मुख्यमंत्री मदतनिधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून ट्विटरवरुन आरोहच्या या अनुकरणीय उपक्रमाचं कौतुक केल्याचं समजतंय.
सामाजिक कार्य करण्याकडे माझा कायमचं कल असतो. यापूर्वीही मी अशीच काही माध्यमातून मदत केली आहे. मात्र मी केलेल्या मदतीविषयी मला फार काही बोलायला किंवा सांगायला आवडत नाही, असं आरोहने म्हटलं आहे.
जेव्हा मी बिग बॉसच्या घरात होतो. तेव्हा महाराष्ट्रावर एवढं मोठे संकट कोसळलं होतं. बाहेर आल्यावर मला या गोष्टीची जाणीव झाली. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना आर्थिक बळाची आवश्यकता असते. आपणही त्यात खारीचा का होईना वाटा उचलावा ही इच्छा झाली. आणि मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मदतनिधी दिला आहे, असंही आरोहने म्हटलं आहे.
दरम्यान, आरोह अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. ‘आय व्होट’ सारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये तो सहभागी झाला आहे. दिव्यांगांसाठीही तो काम करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
निवडणुकीआधी म्हणता ओला-उबरमुळे रोजगार वाढले आणि आता म्हणता…; प्रियांका गांधी सरकारवर बरसल्याhttps://t.co/9ailNOaQhp@priyankagandhi @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019
लालबागच्या दर्शनाला गेलेल्या स्वरा भास्करची चप्पल गेली चोरीला!- https://t.co/APoZU4N0BH #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019
भारतापाठोपाठ मोदींचा अमेरिकेतही डंका…! सभेसाठीचं स्टेडिअम हाऊसफुल्ल – https://t.co/IHOsaL5GG4 @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019