मुंबई | सध्या सगळीकडे फक्त बिग बॉसची धूम पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या बिग बाॅस ओटीटीमध्ये तिसरा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून बिग बॉस ओटीटीच्या घरात अनेक नवीन घडामोडी दिसत आहे. त्यामुळे या शोला चांगलीच रंगत आलेली पाहायला मिळत आहे. अशातच या वादग्रस्त घरात अनेकांचं कनेक्शनही पाहायला मिळतं.
बिग बाॅसच्या घरात या आधी देखील अनेक जोडप्यांचा रोमान्स रंगला आहे. यावर्षीच्या घरात सर्वांचं लक्ष वेधलं आहे ते म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बाबटनं. या शोमध्ये दिवसेंदिवस शमिता शेट्टी आणि राकेश बापटमधील जवळीक वाढताना दिसतेय.
अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बाबटच्या एका व्हिडीओनं सध्या अनेकांच्या नजरा खिळवल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये त्यांचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळत आहे. शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यात राकेश बापट शमिता शेट्टीला तिच्या गालावर किस करताना दिसत आहे.
या व्हिडीओत शमिता जेवण करत आहे. राकेश माइक्रोवेवमध्ये जेवण गरम करतोय. शमिता राकेशला काही सूचना देताना दिसतेय. यावर राकेशनं तिला “आणखी काही?” असा प्रश्न विचारतो. तुला काही अडचण आहे का? या शमिताच्या प्रश्नावर राकेशने “तुझ्याकडे बोलण्यासाठी काही आहे का एवढचं विचारत होतो? असं म्हंटलं.
पुढे दोघांमधील या संभाषणातच शमिता राकेशला म्हणाली,” इथे ये आणि आधी मला एक किस कर” यावर राकेशही लगेचच शमिताजवळ जात तिच्या गालावर किस करतो.
राकेश आणि शमिताला एकत्र पाहून चाहते खूप आनंदी आहेत. राकेश शमिताला किस करत तिचे पाय दाबतानाही दिसत आहे. दोघंही त्यांचा बहुतेक वेळ घरी एकत्र घालवतात. त्यांचं बाॅन्डिंग दिवसागणिक मजबुत होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
ड्रग्स प्रकरणात आता ‘या’ अभिनेत्याच्या घरावर छापा!
हनी सिंगच्या अडचणींत वाढ; घरगुती हिंसाचार प्रकरणी न्यायालयानं फटकारलं, म्हणाले…
भावाच्या मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडलं होतं? ऋषी कपूर यांच्या भावाने केला खुलासा
…म्हणून भरमंडपात नवरदेवासमोरच नवरीने मामासोबत घेतले फेरे; व्हिडीओ व्हायरल
लग्नानंतर सात महिन्याने वरूण धवनने केला मोठा खुलासा, म्हणाला…