मुंबई | आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेल्याचा आरोप सूरतमधून निसटून आलेल्या शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी केलाय. ते मुंबई पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या शिवसेनेने मला जिल्हाप्रमुख, आमदार केलं, त्यांच्याशी प्रतारणा करणं मला पटलं नाही, असंही कैलास पाटील म्हणालेत.
त्या रात्री मला एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बंगल्यावर बोलावण्यात आलं. ते नगरविकास मंत्री असल्यामुळे तिथे काही काम असेल, असं वाटलं आणि मी गेलो. तिथून मला ठाणे महापौर बंगल्यावर नेण्यात आलं, असं कैलास पाटील यांनी सांगितलं.
एक गाडी बदलून आम्ही निघालो. मला वाटलं की कुठे घरी वगैरे जायचं असेल. पुढे ठाणे गेलं, वसई-विरार गेलं, मला या भागातील फारशी माहिती नाही, पण शहरं संपत गेली आणि मला लक्षात आलं की काहीतरी वेगळं घडतंय. पुढे बॉर्डरवर चेकपोस्ट दिसला, तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्याला चुकीच्या दिशेने नेलं जातंय, हे माझ्या लक्षात आल्याचं कैलास यांनी यावेळी सांगितलं.
माझ्या लक्षात आलं, की आता हे आपल्या मागे येतील. म्हणून मी पुन्हा सूरतच्या दिशेने असलेल्या ट्राफिकमध्ये शिरलो. ट्रकच्या रांगांमधून चालत राहिलो. एका बाईकवाल्याने मला गावापर्यंत सोडलं. तिथे एका हॉटेलजवळ काही ट्रकवाल्यांना विचारलं, काही खासगी वाहनांना विचारलं, पण त्यांनी मला सोडलं नाही. नंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन सांगितलं, काही खासदारांना कॉल केला. मोबाईलची बॅटरी 7-8 टक्क्यावर आली होती. ती संपत जाईल म्हणून मी लाईव्ह लोकेशन पाठवू शकलो नाही, असं कैलास पाटील म्हणाले.
दरम्यान,एका यूपीच्या ट्रकवाल्याने माझी विनंती मान्य केली. या काळात पाऊस सुरुच होता, मी भिजत होतो. त्याने मला दहिसर टोलनाक्याजवळ सोडलं. तो अक्षरशः देवदूतासारखा भेटला. मी त्याच्यासोबत सेल्फीही काढल्याचं कैलाय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सूरतमधून निसटून आलेल्या कैलास पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या पत्राने खळबळ; बडवे उल्लेख करत केले अत्यंत गंभीर आरोप
सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसण्याची शक्यता
शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ
‘तुम्ही ठरवा, आता शिवसेनेची जबाबदारी तुमची’; आमदारांमधील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल