चंदीगड | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता काही राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे. अमृतसह जिल्ह्यातील काँग्रेस समितीच्या ग्रामिण विभागाचे अध्यक्ष भगवंतपाल सिंह यांच्यासह काँग्रेसच्या पाच ज्येष्ठ नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं कळतंय.
काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रदीप सिंह भुल्लर, रतन सिंह सोहल, परमजीत सिंह रंधावा आणि तंजिंदरपाल सिंह यांचा समावेश आहे.
यामुळे काँग्रेसला एक मोठा धक्का बसला. काँग्रेस आमदार हरजोत कमल यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशानंही काँग्रेसच्या गटात खळबळ उडाली होती. पंजाबमध्ये सोनू सूद यांच्या बहिणीला मोगा येथून उमेदवार देण्यात आल्यानं त्यांनी भाजपत प्रवेश केला असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री चन्नी यांचे धाकडे भाऊही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून चन्नी यांचे धाकडे भाऊन डॉ. मनोहर सिंह हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसनं उमेदवारी देण्यासाठी नकार दिल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलंय.
काँग्रेसनं आपल्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात मालविका सूद यांनाही मोगातून उमेदवारी देण्यात येत असल्याचं स्पष्ट झालंय. चमकौर साहिब येथून मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे निवडणूक लढवणार आहेत.
तर अमृतसर पूर्वेतील नवज्योत सिंह सिंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर डेरा बाबा नानक इथून उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा हे निवडणूक लढवणार आहेत.
पंजाब काँग्रेसच्या पहिल्या यादीत 86 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात केवळ 9 महिलांना स्थान देण्यात आली आहे. दरम्यान, 0 टक्के महिलांना संधी देण्याचा दावा करण्यात आला होता. त्याचबरोबर युवक काँग्रेसचे चार उमेदवार बरिंदर ढिल्लों, ब्रह्म मोहिंद्रा यांचा मुलगा मोहित मोहिंद्रा, अमरप्रीत लल्ली आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रमुख सुनील जाखड यांचे भाचे संदीप जाखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोबतच दोन खासदार डॉ. अमर सिंह आणि चौधरी संतोष सिंह यांच्या मुलाचाही काँग्रेसच्या पहिल्या यादीत समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
उदयनराजेंना आवरला नाही ‘पुष्पा’चा मोह, ‘बलम सामे’ गाण्यावर उडवली काॅलर; पाहा व्हिडीओ
फटे स्कॅम! शेअर मार्केटच्या नावावर बार्शीच्या विशालनं लावला कोट्यावधींचा चुना
“कंडोमपेक्षा कोरोना टेस्ट महत्त्वाची, सेक्सपूर्वी हे नक्की करा”
किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ
विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव