अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर

नवी दिल्ली| भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Ravat) आणि त्यांच्या पत्नीचा तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे.

अपघातात लष्करी सेवेतील एका मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्याचा मृ्त्यू झाल्यानं देशावर शोककळा पसरली आहे. सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. अशात बिपीन रावत यांच्या बाबतीतला एक योगायोग समोर आला आहे.

बिपीन रावत यांचं डिसेंबरशी असलेलं नातं समोर आलं आहे. जनरल रावत यांच्या लष्करातल्या पदार्पणापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत सर्व प्रमुख घटना सर्व डिसेंबर महिन्यात घडल्या आहेत.

बिपीन रावत हे पहिल्यांदा लष्करी अधिकारी झाले तेही डिसेंबर महिन्यातच. तारीख होती 16 डिसेंबर 1978. गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये त्यांना ऑफिसर बनवण्यात आलं.

दोन वर्षांनी म्हणजे 1980 साली रावत यांचं प्रमोशन झालं. ते लेफ्टनंट झाले, ती तारीख होती 16 डिसेंबर 1980. त्यानंतर 9 वर्षांनी त्यांचं पुन्हा प्रमोशन झालं. ते होतं मेजर होण्याचं. ते मेजर झाले ते 16 डिसेंबर 1989 रोजी.

रावत यांनी जे मर्दूमकी गाजवली त्यासाठी लष्कराच्या आर्मी कमांडर ग्रेडमध्ये त्यांना पुन्हा प्रमोशन मिळालं. तेही 2015 च्या डिसेंबरमध्येच.

लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर जनरल रावत हे पहिले सीडीएस झाले तेही डिसेंबर महिन्यातच. 30 डिसेंबरला जनरल रावत हे निवृत्त झाले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी सीडीएस म्हणून काम सुरु केलं. म्हणजेच तारीख होती 31 डिसेंबर. रावत यांच्या जीवनात डिसेंबरचं खूप महत्व आहे कारण त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी या याच महिन्यात घडल्या. आणि त्यांचा शेवटही डिसेंबरमध्येच झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं? 

“…तेव्हाच अशा घटना होतात, मला घातपाताची शक्यता वाटते”

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल 

CDS बिपीन रावतांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय! 

लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचं दुर्दैवी निधन!