राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचं सावट, ‘या’ ठिकाणी अनेक पक्षांचा मृत्यू

मुंबई | कोरोना महासाथीच्या रोगानं जगभरात हाहाकार माजवला आहे. अशातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर नागरिकांना हैराणंच करुन टाकलं आहे. कोरोनाचं टेंशन संपत नाही तोच आणखी एका गोष्टीनं चिंतेत भर पाडली आहे.

कोरोनाच्या विषाणूच्या थैमानानंतर आता राज्यात ‘बर्ड फ्लू’चं सावट पहायला मिळत आहे. ‘बर्ड फ्लू’चं सावट पुन्हा एकदा पहायला मिळत असल्यानं व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे.

ठाण्यातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांना एव्हीयन इन्फ्लूएंझा A(H5N1) या विषाणूची लागण झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे.

राज्यात कोरोना व्हायरसनंतर आता बर्ड फ्लूचा शिरकाव पहायला मिळत आहे. शहापूर तालुक्यातील वेल्हेवली येथील फार्मध्ये काही पक्षांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. याविषयी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी माहिती दिली.

शहापूरच्या फार्ममध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर त्या फार्मपासून एक किलोमीटरच्या परिघात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. 11 आणि 13 फेब्रुवारीला मृत पक्षांचे नमुने गोळा करण्यात आले होते. ते नमुने पुण्यातील पशुसंवर्धन विभागाच्या रोग तपासणी विभागात मुल्यांकन करण्यात आले.

बर्ड फ्लूचा संसर्ग हवेतून पसरत असल्यानं प्रशासनानं उपाययोजना सुरु केल्या आहेत. प्रशासनानं लगेच घाबरुन न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला असून नागरिकही हैराण झाले आहेत.

पुन्हा एकदा बर्ड फ्लूनं डोकं वर काढल्याचं समजताच व्यावसायिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नसलं तरी सावधानता बाळगण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; मोदी सरकार लवकर ‘हा’ निर्णय घेणार

 “तीन पक्षांचं सरकार असलं तरी…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य

तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ

स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!

किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला