भाजपचे 14 आमदार आमच्या संपर्कात पण…; जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

मुंबई |  भाजपचे 14 आमदार आमच्या संपर्कात आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसंच जरी ते आमदार आमच्या संपर्कात असतील तरी आम्ही मात्र त्यांना घेण्याचा विचार करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

आमदार फोडण्याची संस्कृती ही भाजपची आहे. आपण अनेक ठिकाणी पाहिलं भाजपने कशा प्रकारे इतर पक्षाचे नेते आणि आमदार फोडले. आमदार फोडणे ही संस्कृती आमची नाही. त्यामुळे आम्ही आमदार फोडणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

भाजपचे नेते सत्तेत जाण्याची स्वप्न बघत आहेत. तसंच त्यांच्या आमदारांना देखील ते सत्तेत जाण्याची स्वप्न दाखवत आहेत. अशी स्वप्न दाखवणं त्यांच्या फायद्याची आहेत कारण आमदार टिकवण्यासाठी त्यांना तसं करावं लागत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

“सुधीर मुनगंटीवार यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल काय? याची मुनगंटीवार वाटच बघत आहेत. अशी स्वप्नरंजनं मुनगंटीवार करतायेत. म्हणून पाच वर्ष सरल्यानंतर जसं ‘मुंगेरीलाल के सपने’ हे पुस्तक आहे तसं आम्ही ‘मुनगंटीवार के सपने’, असं पुस्तक प्रसिद्ध करू”, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-

-उत्तर कोरिया जर कोरोना व्हायरसने शिरकाव केला तर…; किम जोंग उनने अधिकाऱ्यांना धमकावलं

-शिवसेनेला वारंवार प्रेमाचा प्रस्ताव देणाऱ्या मुनगंटीवारांना जयंत पाटलांचा टोला; म्हणाले…

-‘हे’ भाजपचं हे ऑपरेशन लोटस नसून, कोरोना व्हायरस आहे; अशोक चव्हाणांचा भाजपला टोला

-कोरोनाच्या भीतीने नरेंद्र मोदींनी घेतला होळी न खेळण्याचा निर्णय!

-घरात वडीलांचा मृतदेह, अन् मुलाच्या डोळ्यासमोर भविष्याचं ध्येय!