भाजपची चौथी यादी जाहीर; या बड्या नेत्यांचा पत्ता कट

मुंबई : भाजपने पहिल्या तिन्ही यादीत होल्डवर ठेवलेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. नुकतंच भाजपची चौथी यादी जाहीर झाली आहेत. या यादीत मुक्ताईनगरमधून खडसेंच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

बोरीवलीतून विनोद तावडेंच्या जागी सुनिल राणे आणि घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहतांच्या जागी पराग शहांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे विनोद तावडे आणि प्रकाश मेहतांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला होता. 

पहिल्या यादीत नाव न आल्यानंतरही खडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना पुढच्या यादीत नाव येईल असा आशावाद व्यक्त केला होता. 

विधानसभा निवडणूक २०१९ भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची यादी क्र. ४@Dev_Fadnavis@ChDadaPatil#पुन्हा_आणूया_आपले_सरकार pic.twitter.com/dHfNwWJ4j9

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 4, 2019

 

महत्वाच्या बातम्या-