देश

राम कदमांनंतर भाजपच्या आणखी एका मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप नेत्यांकडून केली जाणारी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा विषय अजून संपला नाही तोच भाजपच्या आणखी एका मंत्र्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते फक्त भाजपचे नेतेच नाहीत तर ते मध्य प्रदेश सरकारमध्ये शिक्षण मंत्री सुद्धा आहेत. आज शिक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी मुक्ताफळं उधळली.

काय म्हणाले भाजपचे नेते?

जर गुरुंच्या समोर टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, असं उत्तर प्रदेश सरकारमधील शिक्षणमंत्री कुंवर विजय शाह यांनी म्हटलं आहे. शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला कुंवर विजय शाह गेले होते.

“आमचे सहकारी टाळ्या वाजवण्याऐवजी टाळ्या वाजवण्याचं नाटक करतात. गुरु हा देवापेक्षा मोठा असतो, त्यामुळे गुरुंचा सन्मान करा. गुरुंसाठी टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील- 

कुंवर विजय शाह, मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री

पाहा व्हीडिओ-

आधीच भाजपचे राम कदम वादात-

भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आधीच वादात सापडलेले आहेत. मुलगी पसंत असेल तर घरच्यांना माझ्याकडे आणा. त्यांचा होकार असेल तर मुलीला पळवून आणतो आणि तुम्हाला देतो, असं वादग्रस्त वक्तव्य राम कदमांनी केलं आहे. विरोधी पक्षांनी सध्या भाजपला या मुद्द्यावरुन चांगलंच घेरलं आहे.