भाजपला मोठा धक्का! भाजप कॅबिनेट मंत्र्याचा मंत्रीमंडळ बैठकीतच राजीनामा

नवी दिल्ली | निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. उत्तरखंड सरकारमध्ये रावत हे कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर पडले. अर्थातच बैठकीच्या दरम्यानच त्यांनी राजीनामाही देऊन टाकल्याची माहिती आहे.

हरकसिंह रावत गेल्या पाच वर्षापासून त्यांचं क्षेत्र असलेल्या कोटद्वारमध्ये एका मेडीकल कॉलेजची मागणी करत होते. हाच मुद्दा त्यांनी सरकारमध्ये कित्येक वेळेस मांडला पण त्यांची मागणी काही पूर्ण झाली नाही.

उत्तराखंडमध्ये अवघ्या काही महिन्यात लागोपाठ मुख्यमंत्री येत राहीले पण हरकसिंह रावत यांच्या मागणीकडे प्रत्येकानं दूर्लक्ष केल्याचं सांगितलं जातंय. शेवटी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हाच मुद्दा मांडला तर तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यावरुन मग त्याच बैठकीत त्यांनी राजीनामा दिला आणि बाहेर पडले.

बैठकीतून बाहेर आल्यानंतर हरकसिंह रावत यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. ते चांगलेच रडत होते. लोकांनी भिकारी करुन टाकल्याचं वक्तव्यही त्यांनी केल्याचं वृत्त आहे. स्वत:च्याच सरकारनं तेही कॅबिनेट मंत्री असताना.

2016 मध्ये उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार पाडण्यात हरकसिंह यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याच हरकसिंह यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारविरुद्ध बंड पुकारल्याने उत्तराखंडच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंत्रिपद सोडल्यानंतर हरकसिंह काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून तसे झालेच तर हरीश रावत यांच्याशी त्यांना जुळवून घ्यावं लागणार आहे.

उत्तराखंड मध्ये पुढच्या काही काळात विधानसभा निवडणूका आहेत. भाजपनं तिथं काही महिन्याच्या अंतरानं तीन मुख्यमंत्री बदलले. त्यानंतर आता हरकसिंह रावत यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. म्हणजेच उत्तरखंडमधलं राजकीय नाट्य संपताना दिसत नाहीये.

महत्वाच्या बातम्या –

‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर 

अत्तरवाल्याकडे सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले, मागवावा लागला कंटेनर 

भारतातील Omicron बाधितांचा धक्कादायक रिपोर्ट समोर, ‘कोरोना लस घेतलेल्यांनाच…’ 

“अभिनेत्यानं माझं चुंबन घेतलं अन् माझ्या स्तनांना…”, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

 दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…