Top news पुणे महाराष्ट्र राजकारण

‘भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

Raj Thaceray Ramdas Athavle e1651841459816

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वादळी सभेनं राज्यातील वातावरण जोरदार पेटलं आहे. काल गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना राज यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं.

राज ठाकरेंच्या कालच्या गर्जनेचे पडसाद आजही ठळक उमटत आहेत. अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही यावर आपलं मत मांडलं आहे.

पिंपरी चिंवडमध्ये बोलताना रामदास आठवले यांनी राज ठाकरेंविषयी वक्तव्य केलं. राज ठाकरे हे अगोदरपासूनच हिंदुत्वाकडे झुकलेले आहेत. मात्र, आम्हाला राज ठाकरेंची आवश्यकता नाही. भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही. कारण त्यांचा अजेंडा वेगळा आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आमची इच्छा आहे हे सरकार पडावं, पण कुठला पक्ष फुटेल असं दिसत नाही. काँग्रेस पक्षातील बरेच आमदार नाराज आहेत, असंही आठवले म्हणाले.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच हे सरकार चालवत आहेत. त्यांच्याकडून काँग्रेसला सत्तेतून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आहे. अशा सरकारमध्ये काँग्रेसने राहू नये. लवकरात लवकर पाठिंबा काढला पाहिजे, असा खोचक सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे.

भाजप हा देशात मजबूत पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष असताना राज ठाकरे यांची काय आवश्यकता आहे. राज ठाकरेंना युतीमध्ये घेऊ नये, असं माझं मत असल्याचं रामदास आठवले यांनी सांगतिलं.

राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, परंतु मतं मिळत नाहीत, असा घणाघातही आठवलेंनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाची आगा पेटत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर सध्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत असून त्यांच्यावर टीकास्त्रांचाही वर्षावर होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “शरद पवार यांच्यावर मी Phd करतोय, इतक्या जास्त वयात ते…”

  “देवेंद्रजी, तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर….”; काॅंग्रेसचा घणाघात

  “पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा”

  Corona Update: ‘या’ ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ

  “राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले”