मोदी-शहांच्या अडचणीत वाढ; भाजप मुख्यमंत्र्याचाच नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात गोंधळाची स्थिती आहे. काँग्रेससह अन्य पक्षांनी या कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. असं असतानाच आसामचे भाजपचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनीही सीएए विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसाठी हा मोठा धक्का आहे.

मी आसामचा पुत्र आहे, बाहेरच्या लोकांना आसाममध्ये स्थिरावू देणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला आहे. याआधी आठ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या कायद्याला विरोध केला होता. आता भाजप मुख्यमंत्र्यानेच विरोध दर्शवल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर वातावरण तापलं आहे. देशभर आंदोलनं होत आहेत. आसाममध्ये या आंदोलनांची तीव्रता अधिक जाणवली. जनमानसांचा कल लक्षात घेत सोनोवाल यांनी ही भूमिका घेतली असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशातील अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व मिळू शकणार आहे. मात्र, या कायद्यामुळे काही राज्यांना अधिकचा ‘जन’भार सोसावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-