भाजप ही राष्ट्रीय आपत्ती म्हणणाऱ्या पवारांना ट्वीट करून भाजपचा रोखठोक सवाल!

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. यावर भाजपने पवारांच्या टीकेला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. याबाबत भाजपने ट्विट केलं आहे.

भाजपने आपल्या ट्विटमध्ये 303 जागा जिंकणारा भाजप पक्ष हा राष्ट्रीय आपत्ती आणि 5 जागा जिंकणारी राष्ट्रवादी ही राष्ट्रीय संपत्ती! काय लाॅजिक आहे. वाह पवार साहेब वाह! आता तरी तुम्हाला आपत्ती आणि संपत्ती यातील फरक समजेल, हीच अपेक्षा!!!, असं ट्विट करत भाजपने पवारांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.

सगळ्या राजकीय पक्षांच्या नेतृत्वामध्ये भाजप हा देशाची आपत्ती आहे. आणि ही आपत्ती घालवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. ही लोकांची भावना आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.

दरम्यान, भाजपच्या पराभवाची ही आता सुरूवात झाली आहे. त्यांच्या पराभवाची मालिका थांबणार नसल्याचीही टीका शरद पवार यांनी केली होती.

 

महत्वाच्या बातम्या –

-रितेश-जेनेलिया घेणार ‘व्हॅलेंटाईनदिनी ‘या’ प्रसिध्द राजकारणी जोडीची मुलाखत

-रितेश-जेनेलिया घेणार ‘व्हॅलेंटाईनदिनी ‘या’ प्रसिध्द राजकारणी जोडीची मुलाखत

-“शाहरूख खानसोबत तुलना हे तर माझं भाग्यच”

-…अन् धनंंजय मुंडे धावून गेले त्या जवानाच्या मदतीला

अरविंद केजरीवालांच्या शपथविधीची तारीख ठरली अन् मैदानही ठरलं!