भाजपचा सभात्याग… ‘घाबरून पळाले’ म्हणत काँग्रेसने उडवली भाजपची खिल्ली!

मुंबई : ठाकरे सरकारचा विश्वास ठराव मतदानाला येताच भाजप आमदारांनी संविधानाची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत सभात्याग केला. नही चलेगी नही चलेगी…. दादागिरी नहीं चलेगी, अशा घोषणा देत भाजप आमदारांनी सभागृह दणादून सोडलं. तर महाआघाडी सरकारच्या बाजूचं संख्याबळ पाहून भाजप पळून गेलं, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी खिल्ली उडवली.

ठाकरे सरकारचा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पार पडला. ठरावाच्या बाजूने असणाऱ्या आमदारांची मोजणी झाली. 169 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केलं तर 4 आमदारांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मनसे, एमआयएम, सीपीआयएम या पक्षांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

महाराष्ट्र विधानसभा इतिहासात हंगामी अध्यक्षाने बहुमताचा प्रस्ताव मांडला नाही. नव्याने हंगामी अध्यक्ष का बदलले? सगळ्या संविधानिक गोष्टींची पायमल्ली होत आहे. तुमच्याकडे 170 होते तर कसली भीती होती? असा सवाल भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला केलं.

दरम्यान, विश्वासदर्शक ठराव पार पडल्यानंतर सभागृहाने माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आभार मानतो. पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार ज्यांच्यामुळे मी इथे आहे, छत्रपती शिवराय हे आमचं दैवत त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करतोय, असं भाषणाच्या सुरूवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-