राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही पण हे सरकार आपोआप कोसळेल- देवेंद्र फडणवीस

मुंबई |  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी किंवा राज्यात सरकार स्थापन करण्याची आमची कोणतीही इच्छा नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. हे सरकार कसेबसे चालले आहे. त्यामुळे हे सरकार कुणी पाडण्याची गरज नसून ते आपोआपच कोसळणार आहे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

कोरोनाच्या या संटकाळात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असं आम्हाला वाटत नाही. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन कोरोनाची लढाई लढावी लागणार आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी वा कोणतेही राजकीय संकट उभे राहावे, असे आम्हाला अजिबात वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले.

राज्यातील कोरोना साथीची स्थिती चिंताजनक आहे. देशातील 36 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र सरकारने नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली नसल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

धारावी व वरळी भागात करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. मुंबईत रुग्णालये, बेड, अ‌ॅम्ब्युलन्सचा तुटवडा आहे. करोनाचे रुग्ण रस्त्यावर मरत आहेत. सरकारने ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या. त्या केल्या नाहीत म्हणूनच ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

-जर मला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर…; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

-कोरोनाच्या संकटकाळात राज्यपाल कोश्यारींनी घेतला मोठा निर्णय

-आगामी काळात कृषी विभागासाठी लॉकडाउन नसणार आहे- दादा भुसे

-राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानं दाखवला मनाचा मोठेपणा; राहता बंगला दिला क्वारंटाईनसाठी

-अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण : अखेर सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल