मुख्यमंत्रिपद गेलं यावर विश्वास बसायला दोन दिवस लागले- देवेंद्र फडणवीस

मुंबई |  अजित पवार यांच्या साथीने सरकार बनवलं आणि ते दोन दिवसांत कोसळलं. त्यामुळे साहजिकच माझं मुख्यमंत्रिपद गेलं, यावर माझा विश्वास बसायला मला दोन दिवस लागले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पत्रकार राजू परूळेकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सत्तासंघर्षातील त्या 36 दिवसांत नेमकं काय काय झालं? यावर भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,  “तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात अशी कल्पना मला केंद्रिय नेतृत्वाने दिली होती. केंद्रिय नेतृत्व मला सारखं तुम्हाला लीड करायचं…. तुम्हाला लीड करायचंय… असं सांगत होतं. त्यामुळे मला कल्पना आली होती की पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. पण आमच्या पद्धतीनुसार ते कुणाला कळू द्यायचं नव्हतं.”

“कुटुंबियांनादेखील या बद्दलचं काही एक माहिती नव्हतं. अगदी या कानाची दुसऱ्या कानाला देखील खबर पोहचवायची नव्हती. त्यामुळे मी बाहेर कुणालाही काहीही बोललो नाही. त्यामुळे माझा आनंदही बाहेर दिसला नाही. साहजिक बातमी कळाल्यावर जसा आपल्याला एकदम आनंद होतो ती स्थिती माझ्याबाबतीत काही आली नाही. ”

“ज्यावेळी कुणाला वाटलं नव्हतं की मुख्यमंत्री होईल त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो. अन् जेव्हा माझ्यासहित सगळ्यांना माहिती होतं की मुख्यमंत्री होणार आहे त्यावेळी झालो नाही. पण त्याचं दु:ख निश्चित झालं. हे सगळं विश्वास ठेवण्याजोगं नव्हतं. आता मी मुख्यमंत्री नाही यावर विश्वास बसायला मला दोन दिवस लागले.”

“मला हे कळत नव्हतं की असं होऊ कसं शकतं?? सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने असताना… सगळ्यात जास्त आमदार भाजपचे असताना… सगळ्यात जास्त युतीचे आमदार निवडून आले असताना… जे वादळ होतं ते संपेल असं वाटलं होतं … असं सगळं असताना मुख्यमंत्रीपद हातून गेलं कसं? असा प्रश्न मला पडला पण त्यानंतरच्या 10 ते 15 दिवसांमध्ये मी नंतर पहिल्यासारखं नॉर्मल झालो ”

महत्वाच्या बातम्या-

-नवविवाहितेची आत्महत्या; अंत्यविधीवेळी पतीनं केलेलं कृत्य ऐकून काळजाचा थरकाप उडेल

-“तुमची अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत तर अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय”

-राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांना खुलं पत्र; पत्रात अनेक धक्कादायक आरोप

-कृषीमंत्री दादाजी भुसे यांचं शेतकऱ्यांना ‘हे’ कळकळीचं आवाहन

-मुंबईतली कोरोना स्थिती कधी नियंत्रणात येईल?, महापालिका आयुक्तांनी सांगिती तारीख!