Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“देशात भाजपची तानाशाही सुरु आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं”

मुंबई | सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्यानं आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना टार्गेट करण्याचा एकंही मुद्दा सोडत नाहीत. अशातच आता पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखावर आज संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी आपली परखड भूमिका मांडली आहे. देशात भाजपची तानाशाही सुरु आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं, असं मत राऊत यांनी यावेळी मांडलं आहे.

तसेच यावेळी राऊत म्हणाले की, देशातील ज्या राज्यांत भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही. त्या राज्यांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ मिळत नाही. भाजपची तानाशाही चालू आहे. ज्या राज्यात भाजपच्या विरोधातील सरकार आहे. त्या राज्यात भाजपकडून त्रास दिला जात आहे.

या तानाशाही विरोधात डाव्या उजव्यांनी एकत्र यायला हवं. सर्वांनी एकत्र येऊन या तानाशाही विरोधात आवाज उठवला पाहिजे, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच देशातील राजकारणात शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वगळता इतर कोणताही पक्ष संपूर्ण ताकदीने लढताना दिसत नाही. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार हे बरोबरीचे नेते आहेत. यांच्या नेतृत्वाला देशात सर्वमान्यता आहे. त्यामुळे देशात नेतृत्वाची उणीव आहे, असं नाही.

जर भाजपला आवाहन द्यायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन मजबूत संघटना स्थापन करणे गरजेचं आहे. विरोधी पक्ष कमजोर होणं म्हणजे लोकशाही संपणे असं आहे, असं देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…मग ठाकरे सरकारविरुद्ध आंदोलन करा’; राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य!

स्वस्तात सोनं खरेदी करायचं आहे, तर मग हीच आहे सुवर्णसंधी! 28 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंतच आहे ‘ही’ योजना

‘केंद्रातील पथक चौकशीसाठी येतं, पाहणीसाठी नाही’; केंद्रीय पथकाविषयीच फडणवीसांचा मोठा खुलासा!

ईडीच्या नोटीसनंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नोटीसवर दुजोरा देत म्हणाले…

“इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं, आता कसं वाटतंय?”