जळगाव | विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचा खुलासा केला आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं आहे.
विधानपरिषदेसाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. पण ज्यांचा पक्षाशी संबंध नाही किंवा पक्षविरोधी काम केली आहेत अशा व्यक्तींना संधी देण्यात आल्याचंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.
मला संधी दिली नाही तरी ठीक आहे. पण पक्षात अनेक लोक तिकीट मिळेल या आशेने गेली कित्येक वर्ष निष्ठेने काम करत आहेत. पण कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता सध्या असा निर्णय घेणं योग्य राहणार नाही, असं खडसे म्हणाले आहेत.
दरम्यान, कोरोनासारख्या गंभीर स्थितीत राजकीय विचार करणं तसंच राजकारणावर चर्चा करणं योग्य ठरणार नाही, असंही खडसेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन यांची प्रकृती स्थिर
-‘या’ कारणामुळे अभिनेत्री पूनम पांडेला घराबाहेर जाणं महागात पडलं
-मुख्यमंत्र्यांचा विधान परिषदेचा अर्ज दाखल; ठाकरे कुटुंबाची विधान भवनात हजेरी
-“कॉंग्रेसने सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकाऱ्याला संधी द्यायला हवी होती”
-‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचं होतं, काँग्रेसच्या भूमिकेचं सामनामधून कौतुक