मुंबई : राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका बसला आहे. आज राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या नेत्यांना पक्षात कसं घेतलं याचं गुपित सांगितलं आहे.
आधी सुजय विखेंना पकडलं मग राधाकृष्ण विखे आले. आम्ही वैभव पिचड यांना पकडलं आता मधुकर पिचड आले आणि आता संदीप नाईक आलेत मग गणेश नाईक येतील, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये झालेल्या प्रवेशांबाबत रहस्य उलगडलं आहे.
आज राष्ट्रवादीचे वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक आणि चित्रा वाघ आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह मधुकर पिचड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिग्गज नेत्यांचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून गौरव केला. त्याचवेळी त्यांनी मुलगा मग वडिल हे रहस्य उलगडलं.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवशी मुहूर्त साधत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.
महत्वाच्या बातम्या-
-मी गद्दार नाही…. पळून गेले नाही- चित्रा वाघ
-राष्ट्रवादीच्या या दिग्गज नेत्यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती!
-गरवारे क्लबमध्ये भाजपची ‘मेगा भरती’; ‘भाजप जोमात राष्ट्रवादी कोमात…!’
-…तर मी अमित शहांना भेटायला गेल्याचं छापलं असतं- शरद पवार
-सुनिल तटकरे गेले चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर अन् नव्या राजकीय चर्चांना उधाण