मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ या अभियानांतर्गत 14 ट्रक मदतसामुग्री आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालय, मुंबईहून कोकणात रवाना करण्यात आली.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, सुनील राणे, राहुल नार्वेकर आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. या मदतसामुग्रीत सिमेंटचे पत्रे, ताडपत्री, अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, कोळसा, सोलर कंदिल, मेणबत्ती, माचिस आदी सामुग्रीचा समावेश आहे. मुंबई भाजपाच्या वतीने गेली दोन दिवस एक अभियान राबविण्यात आले आणि त्या अभियानातून जनसहभागातून ही मदतसामुग्री गोळा करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात जी मदत गोळा झाली, ती 14 ट्रक सामुग्री आज रवाना करण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि कोकण विभागाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांची एक बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली होती आणि त्यात मदतसामुग्री तातडीने रवाना करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनानुसार, ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
कोेकणावर आलेले हे संकट मोठे आहे आणि या संकटात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहील. तातडीच्या स्वरूपात जी काय मदत लागेल, ही त्यांना देण्यासाठी पक्ष काम करेल. आज पहिल्या टप्प्यात 14 ट्रक मदतसामुग्री रवाना करण्यात येत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाला तर आहेच. पण, वीजेची आवश्यकता लक्षात घेता सोलर कंदिल आणि निवार्याच्या सुविधा लक्षात घेता सिमेंटचे पत्रे आणि ताडपत्री यांचा समावेश यात करण्यात आला आहे. यापुढे सुद्धा हा उपक्रम असाच सुरू राहील, असे देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
-भाजप नेते गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं; चंद्रकांतदादांचा निशाणा
-पुण्यात आज 166 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती नव्या रूग्णांची झालीये नोंद…
-शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे- उद्धव ठाकरे
-वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव, प्रकाश आंबेडकर यांनी केली ‘ही’ प्रमुख मागणी
-लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचं सरकारकडे कसलंच नियोजन नाही- राजू पाटील