“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात चांगलाच वाद रंगल्याच पहायला मिळत आहे. दवसेंदिवस हा वाद चिघळत चालल्याचं देखील दिसून येतंय.

राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे राजकिय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत हे अनेक मुद्द्यांवरून भाजपच्या आरोपांना उत्तर देत असतात. त्यामध्ये आता त्यांनी भाजप नेत्याचा एक व्हिडीओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खलबतं पहायला मिळत आहे.

सचिन सावंत म्हटलंय की, भाजप हा भारतीय संस्कृती आणि राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी आहे. ते माझे वक्तव्य सारखेच अधोरेखित करत असतात. यालाच अनुसरून सावंत यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत भाजप नेते म्हटले की, जो व्यक्ती भाजपला मत देणार नाही, त्याच्या अंगात मियाचे रक्त नाही. तो आपल्या वडिलांची नाजायज पैदाईश आहे, असं वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ डूमरीयागंज येथील भाजप नेत्याचा आहे.

भाजपच्या याच नेत्याच्या वक्तव्यावरून सचिन सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्यावर ते म्हणतात नौटंकी ही शेवटी नौटंकीच असते.

दरम्यान, सचिन सावंत यांनी या अगोदर भाजपला भारतीय संस्कृती आणि राजकिय व्यवस्थेला लागलेली वाळवी म्हणजे भाजप असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला खरं ठरवणारा हा व्हिडिओ असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…

थेंबे थेंबे तळे साचे! पोतंभर चिल्लर देऊन अखेर पठ्ठ्यानं स्कुटी घेतलीच; पाहा व्हिडीओ

नंबर 1 यारी! खचलेल्या लाडक्या चिकूसाठी युवराजने लिहिलं पत्र, म्हणाला…

Corona: महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

  Urrfi Javed: “‘या’ दिग्दर्शकानं माझ्याकडे लैंगिग सुखाची मागणी केली”