मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घालूनही शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे.
सुरत येथे शिंदे गट असताना काही भाजप नेते ले मेरेडियन हॉटेलमध्ये दिसले. त्यामुळे यामागे भाजपचा सहभाग असल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली. भाजपचा कोणताही मोठा नेता यात अजूनतरी दिसला नाही, असं अजित पवार म्हणाले होते.
भाजपचा कोणताही मोठा चेहरा यात दिसला नाही त्यामुळे भाजपचा यात काही संबंध आहे असं वाटत नाही, असं अजित पवार म्हणाले. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचं वक्तव्य नाकारलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमागे असाणारा राष्ट्रीय पक्ष भाजपच आहे. अजित पवारांना त्याची जास्त माहिती नसेल, असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.
अजित पवारांना इथली स्थानिक माहिती आहे. मात्र, गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हाला जास्त माहिती आहे, असंही शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी त्यांच्यामागे एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचा सांगितलं. देशात सहा राष्ट्रीय पक्ष असून भाजप सोडून इतरांचा त्यामागे हात आहे का याचा विचार करावा लागेल, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘का उगाच वणवण भटकताय, चर्चा होऊ शकते’; बंडखोर आमदारांसाठी संजय राऊतांचं ट्विट
‘एकदा तरी चर्चा करायला हवी होती’, राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची नाराजी?
‘आता माघारी जाण्याचा प्रश्नच नाही’, राऊतांच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर
राज्यातील सरकारबाबत नाशिकच्या अनिकेत शास्त्री यांचा सर्वात मोठा दावा, म्हणाले…
‘शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार फक्त…’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य