केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पुणे | केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये राजनाथ सिंह यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे.

आपण विसरता कामा नये की आपण कोणाचे सदस्य आहोत?, असं म्हणत भाजपा ही फक्त देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी पार्टी आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

ज्या विचारधारेने आपण प्रवास सुरू केलेला आहे, त्यावरून आपण राजकारण हे सरकार बनविण्यासाठी नाही तर देश घडविण्यासाठी करतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने देशावर दिर्घकाळ राज्य केले आहे. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही लोकांना मुलभूत समस्यांना तोंड द्यावे लागले आहे, असं टिका राजनाथ सिंह यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम आता जमिनीवर दिसत आहे. त्यामुळे आपण सगळे प्रश्न सोडवले आहेत, असं आपण म्हणू शकत नाही.

भारताला जगद्गुरू बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. भारत सर्वशक्तीमान आणि धनवान बनण्यासोबतचं ज्ञानवान देखील बनला पाहिजे, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

2014 चा आणि आताचा भारत यामध्ये खुप फरक आहे. आज डंके की, चोट पर म्हणू शकतो की, गेल्या पाच वर्षातील नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे भारत हा आर्थिक श्रेणीमध्ये अग्रेसर आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वाढणाऱ्या महागाईला राजनाथ सिंह यांनी रशिया आणि युक्रेन युद्धाला जबाबदार धरलं आहे. या युद्धाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश असूनही तिथे प्रचंड महागाई वाढली आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘नवरात्री आणि मांसाहार…’; सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

‘जनतेचे मुख्य प्रश्न टाळण्यासाठीच राज ठाकरे…’; नाना पटोलेंचा प्रहार

‘नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनियम सुरू’; राष्ट्रवादीचा मनसेला जोरदार टोला

मोठी बातमी ! राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

मोठी बातमी! काॅंग्रेसचा शिवसेनेवर तब्बल 24 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ