देश

“खासदार आझम खान यांचे शीर कापून संसदेवर लटकवा”

नवी दिल्ली | समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्याने गुरूवारी लोकसभेत चांगलाचा गोंधळ उडाला. त्यावर आझम खान यांचे शिर कापून संसदेवर लटकवा, असं वक्तव्य करत भाजपचे अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष आफताब अडवाणी यांनी वाद ओढावून घेतला आहे.  

तुम्ही मला इतक्या चांगल्या वाटता की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघतच राहावेसे वाटते. मला मुभा मिळाली तर मी कधी तुमच्यावरून नजर हटवणार नाही, अशी कमेंट आझम खान यांनी लोकसभा उपाध्यक्ष रमा देवी यांच्यावर केली होती. त्यावर संसदेत एकच गोंधळ उडाला.

रमा देवी यांच्याविषयी आझम खान यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. त्यांचं शीर कापावं आणि संसदेवर लटकवावं. महिलांचा अपमान करणाऱ्या आझम खान आणि असदुद्दीन ओवैसी यांच्याबरोबर काय होतं, हे लोकांना कळेल, असं आफताब अडवाणी म्हणाले.

आझम खान हा म्हातारा वेडावला आहे. त्यामुळे त्याला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे मारायला पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य अडवाणी यांनी केलं.

संसदेत आझम खान यांच्या वक्तव्यावर अनेक सदस्यांनी आक्षेप घेतला. आझम खान यांनी या वक्तव्यासाठी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली. तर अशाप्रकारे बोलणे योग्य नाही. कृपया तुम्ही स्वत:चे शब्द मागे घ्या, असं लोकसभा उपाध्यक्ष रमा देवी म्हणाल्या.

दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही आझम खान यांना माफी मागण्याचा आदेश दिला. यावर रमा देवी मला बहिणीसारख्या आहेत, अशी सारवासारव आझम खान यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

-“साहेबांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील याचा अहिरांनी विचार केला का?”

-इस्लाम धर्मात लग्न हे जन्मोजन्मीच नातं नाही तर ते केवळ कॉन्ट्रॅक्ट- असदुद्दीन ओवैसी

-राष्ट्रवादीचा ‘हा’ नेतासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावर अजित पवार म्हणतात…

-निष्ठावंतांना डावललं तर वेगळा विचार करु; ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

-साताऱ्यातून ‘हा’ उमेदवार विधानसभा निवडणूक लढवेल; अजित पवारांनी जाहीर केलं नाव

IMPIMP