महाराष्ट्र मुंबई

‘नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही इतिहासजमा झाला आहात’; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

मुंबई | 1 मे हा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधूनच सध्याच्या दिल्लीश्वरांनी महाराष्ट्रावर घाव घातला आणि कोणी साधी सळसळही केली नाही. जे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत उभे करण्याचं ठरलं होतं ते खेचून गुजरातच्या गांधीनगरात नेलं आहे, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीका केली होती. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही इतिहासजमा झाला आहात, असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आयएफएससी आजही मुंबईत शक्य आहे. आम्हीच प्रस्ताव पाठवला होता. काँग्रेस सरकारने ते मुंबईला दिले नाही. आज ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना योग्य ठिकाणी चिमटा काढून हे विचारा एकदा. पत्रपंडित हो, कोणी इतिहास बदलला हेही एकदा तपासून पहा, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांना दुर्दैवाने समलिंगी म्हणणारे नालायक काँग्रेस सध्या तुम्हाला प्रिय वाटतय. काँग्रेस सावरकरांचा जो इतिहास सांगत आहे तो तुम्हाला प्रिय वाटतोय..? मग आता आम्हाला कसला इतिहास शिकवताय?, अशा शब्दांत शेलारांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-पिठाच्या पिशव्यांमधून गरिबांना खरंच 15 हजार रुपये वाटले का?; आमिर खाननं स्वतः केला खुलासा

-“भारतात कोरोनाचा संसर्ग लवकरच आटोक्यात येईल”

-मजुरांच्या घरी जाण्याच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार; सोनिया गांधींची मोठी घोषणा

-…तर मुंबईतून केंद्र सरकारला जाणारा सगळा कर रोखू; शिवसेना खासदाराचा केंद्र सरकारला इशारा

-“फडणवीस, महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी गुजरातची वकिली करत आहेत हे क्लेशदायक”