“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण, करुन दाखवा रडून नको”

मुंबई | एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आघाडीची तीन माणसं धावली. घाबरताय कशाला? तुमचं अपयश, नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा, रडून नको, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची आकडेवारी आभासी असून, गोंधळ निर्माण करुन महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवर लागोपाठ आठ ट्विट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात सर्व आलबेल असल्याचं आभासी चित्र निर्माण करणाऱ्या आघाडीच्या तीन माणसांच्या दाव्यांचा पर्दाफाश पत्रकारांनी त्याच जागी केला. पत्रकरांच्या पहिल्या प्रश्नातच मुंबईतील अपयश उघडे झालं आणि तीन माणसं एकमेकांकडे बघत बसले. आभासी फुगा जागीच फोडणाऱ्या पत्रकारांचे आभार, असं ट्विट शेलारांनी केलंय.

तथाकथित अर्थतज्ज्ञ जयंत पाटील हे पण आज विपर्यास करुन-करुन रडले पण किती रडणार? खोटं किती बोलणार? अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडवा ना कुणी रोखलंय तुम्हाला. उगाच पावटे खाल्या सारखं का वागताय?दुर्गंधी का सोडताय? त्यांना जमत नसेल तुम्ही करुन दाखवा, असं शेलारांनी म्हटलंय.

 

महत्वाच्या बातम्या-

-मराठी युवकांकडे कौशल्य नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांचं सडेतोड प्रत्युत्तर

-फडणवीसजी, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे- जयंत पाटील

-…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुलट सोडल्या- अनिल परब

-खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस

-भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू?- जयंत पाटील